चित्रपट निर्माते सदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या

0

मुंबई : चित्रपट निर्माते सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी आज सकाळी ‘लाडाचा गणपती’ मंदिरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज सकाळी मंदिर उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे.

सदानंद लाड यांनीच ‘लाडाचा गणपती’ मंदिराची निर्मिती केली होती. मंदिर निर्मितीनंतर लाड प्रसिद्धीच्या झोतात आले होते. लाड हे चित्रपट निर्माते म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी १५ हून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.