मुंबई : ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंगची भूमिका अभिनेता अनुपम खेरने साकारली आहे. मात्र, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या वादावर खुद्द माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
BJP MP, Kirron Kher: It’s a pathbreaking film. People who speak of freedom of speech i.e Rahul Gandhi, must now practice what he preaches.Anupam told me people will fall in love with Manmohan Singh ji. It should be India’s official entry to the Oscars. #TheAccidentalPrimeMinister pic.twitter.com/SUduFtq0Ue
— ANI (@ANI) December 29, 2018
किरण खेर भाजपाच्या खासदार आणि अनुपम खेर यांच्या पत्नी आहेत. किरण खेर यांनी हा चित्रपट चक्क भारताकडून ऑस्करला पाठवला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधीसारखे व्यक्ती जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करतात त्यांनी आपला विचार कृतीत उतरवून दाखवावा. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक मनमोहन सिंग यांच्या प्रेमात पडतील असंही त्या म्हणाल्या.