चिनावलमध्ये विवाहितेची हत्या : मुलगाही गंभीर जखमी

0

छेड काढल्याचा जाब विचारल्याने आरोपीला राग अनावर : आरोपीला अटक

रावेर : तालुक्यातील चिनावल येथे 24 वर्षीय विवाहितेची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मयत विवाहितेचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सावदा पोलिसात संशयीत आरोपी भोला मोहाशा बारेला (38, रा.धुळकोट बोरी, ता.झिरण्या, ता.जि.खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु.चिनावल) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ईला भाला उर्फ मुकेश बारेला (24) असे मयत विवाहितेचे नाव असून आरोपीच्या हल्ल्यात मयत विवाहितेचा मुलगा कुणाल भाला बारेला (8) हा देखील मानेला कुर्‍हाड लागल्याने जखमी झाला आहे.