सावदा : येथून जवळच असलेल्या चिनावल येथे शेतमाल चोरी करण्यास अटकाव केल्याने शेतकर्याला मारहाण व नुकसान झाल्याची ताजी असतानाच पुन्हा चिनावलच्या शेतकर्याचे एक हजार केळी घड कापून फेकण्याचा आल्याचा प्रकार बुधवार, 23 रोजी उघडकीस आल्याने केळी उत्पादकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी सावदा पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकरी कमलाकर भारंबे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात आरोपींविरुद्ध चोरी व नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वी झाले चार लाखांचे नुकसान
सावदासह चिनावल परीसरामध्ये शेतकर्यांच्या नुकसानीचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी भयभीत होऊन संरक्षणाची मागणी करू लागले आहेत. चिनावल येथील कमलाकर भारंबे, निखील भारंबे, अरविंद भास्कर महाजन, होमकांत महाजन यांच्या शेतातील केळीच्या बागेतील सुमारे चार लाख रुपये किंमतीचे एक हजार केळीचे घड कापून नुकसान करण्यात आले होते.
केळी उत्पादकांवर संकट
केळी उत्पादक शेतकरी आधीच मोठ्या संकटांना तोंड देत असून रोज नव-नवीन नुकसानीचे प्रकार समोर येत असल्याने पोलिसांनी नुकसान करणार्या उपद्रवींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटकाव घालण्याची मागणी होत आहे. शेतकर्यांना अभय न दिल्यास लवकरच पोलिस स्टेशनवर प्रांत कार्यालयात बैलगाडी किंवा ट्रॅक्टर मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात शेतकरी आहेत. दरम्यान, चिनावल येथील केळी उत्पादक बुधवारी संतप्त झाल्यानंतर डीवायएसपी विवेक लावंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, राजेंद्र पवार व कर्मचार्यांनी शांतता प्रस्थापीत केली. दरम्यान, आठवड्याभरात चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांच्याविरोधात दरोड्या गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी चिनावल गावातील श्रीकांत सरोदे, गोपाल नेमाडे, पोलीस पाटील निलेश नेमाडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष योगेश बोरोले, अन्यायग्रस्त शेतकरी कमलाकर भारंबे, तुषार महाजन, सागर भारंबे, ठकसेन पाटील, मनोज पालक, पंकज नारखेडे, गोपाळ पाटील, कमलाकर पाटील, पंकज पाटील, विनायक महाजन, कल्पेश नेमाडे, चंद्रकांत भंगाळे, बंसी धारसे, राहुल शेंडे, राजू पाटील, कुंदन पाटील, सुनील बोंडे, राहुल नारखेडे, संदीप महाजन, दिनेश महाजन, सुनील गाजरे, भास्कर सरोदे, दामोदर महाजन, किशोर महाजन, विलास महाजन, स्वप्नील पाटील, चंद्रकांत कापसे व शेतकरी उपस्थित होते.