चिबंळी फाटा ते केळगांव आळंदी रस्त्याची दुर्दशा

0

चिबंळी : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील औद्योगिक क्षेत्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील चिबंळी फाटा ते केळगांव आळंदी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहन चालकासह प्रवाशीवर्ग त्रस्त झाले आहे. चिबंळी फाटा ते चिंबळीगांवाकडे जाणार्‍या रस्त्यावर केळगांव आळंदीपर्यंतचा रस्ता सर्वत्र खड्डेमय झाला आहे. तर काही ठिकाणी रहदारीचे सांडपाणी रस्त्यावर येवून चिखल निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने जडमालवाहू गाड्यांची वर्दळ सतत चालू असते. 3 डिसेंबर रोजी कार्तिकी यात्रा असल्याने आळंदी येथे जाण्यासाठी हजारो भाविक व दिंडी सोहळ्याचे वारकरी चिबंळी फाटा ते चिंबळी केळगांव या रस्त्याचा वापर करीत असतात. या गोष्टीची दखल घेऊन प्रशासनाने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.