चिमुकलींनी पोलिसदादांना बांधल्या राख्या

0

जळगाव । नवीपेठेतील सु.वा.अत्रे प्राथमिक विद्यामंदिराच्या चिमुकलींनी शनिवारी पुजेचे ताट हातात घेवून पोलिसदादांना राखी बांधण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात हजेरी लावली होती.

यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष रोही व पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत कोसे तसेच डिबी कर्मचार्‍यांना शाळेच्या चिमुकलींनी राख्या बांधल्या. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.