सिध्दिविनायक पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
पिंपरी : भरतनाट्यमफ्युजन यासोबतच देशभक्तीपर गीतांवर ठेका धरत हिरा सामाजिक शिक्षण संस्था संचलित सिध्दीविनायक पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी प्रक्षेकांच्या वन्स मोअरच्या फर्माईशी पूर्ण केल्या. गाणं वाजू द्या, मै नांचू छम..छम, दिल है छोटासा अशा विविध प्रकारच्या गाण्यांनी परिसर दणाणून गेला होता. प्रेक्षकांची वाहवा, शिट्यांचा आवाज आणि टाळ्यांच्या कडकडाटाने चिमुकल्यांचा आनंद व्दिगुणीत झाला होता.
यांची होती प्रामुख्याने उपस्थिती..
मोरेवस्ती परिसरातील सिध्दीविनायक पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे म्हेत्रे गार्डन येथे आयोजन कऱण्यात आले होते. जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पिंपरी-चिंचवडच्या वैशाली काळभोर, नगरसेविका संगिता ताम्हाणे, शाळेचे संस्थापक मारूती जाधव, शाळेच्या अध्यक्षा निर्मला जाधव, मुख्याध्यापिका रेणुका राज, गोदावरी हिंदी महाविद्यालयाचे शिक्षक अवदेश पांडे यांच्यासोबतच शाळेचे शिक्षकवर्ग आणि पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती झाले होते.
जाधव कुटुंबीयांना शुभेच्छा!
गणेशवंदनेने या कार्यक्रमास सुरुवात झाली. चिमुकल्यांच्या नृत्याने मंच दणाणून गेला होता. पालक आपल्या मुलांचे नृत्य पाहूण भारावून गेले होते. यावेळी जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी जाधव कुटुंबीयांनी रूजवलेल्या ज्ञानाच्या वटवृक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आपला मुलगा कुठल्या शाळेत काय शिकतोय याबाबत जागृत राहणे आवश्यक असल्याचे कदम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेणुका राज यांनी केले तर आभार अध्यक्षा निर्मला जाधव यांनी मानले.