चिलगाव येथे अवैध गावठी दारू भट्टी उद्वस्त

0

शेंदुर्णी । प्रजासत्ताक दिनी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार येथून जवळच असलेल्या चिलगाव जवळील दगडी खदाणीत अवैध गावठी दारू गाळून ती चिलगाव व परिसरात विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. या दारूभट्टीवर शेंदुर्णी दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड यांनी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास छापा टाकला व तेथील गावठी दारूभट्टी उद्वस्त करून सुमारे 9हजार रुपये किमतीचे रसायन, 20 लिटर तयार गावठी दारू जप्त केली आरोपी दारू विक्रेता शेखलाल सांडू तडवी याच्यावर प्रॉव्हिशन गुन्हा दाखल केला आहे. यावेळी स.फौ. पंडित महाजन, पो.हे.कॉ. उदय कुलकर्णी, पो.ना. मनोहर पाटील, पो.कॉ. ज्ञानेश्‍वर देशमुख होते. या कारवाईचे परिसरात स्वागत करण्यात येत आहे. यापुढे ही कारवाई करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.