चिल्लरला 75 लाख तर राजेशला 69 लाखांची बोली!

0

नवी दिल्ली । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा रोमांच संपत नाही तोच प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या पर्वाच्या लिलावाने नव्या रोमांचाची वाटचाल सुरु केली आहे. चौथ्या हंगामाच्या लिलावात विक्रमी 53 लाखात खरेदी झालेल्या मोहित चिल्लरवर याही वर्षी विक्रमी बोली लागली आहे. प्रो-कबड्डीच्या पाचव्या सत्रासाठी खेळाडूचा लिलाव सुरु असून या खेळाडूंच्या आत्तापर्यंच्या लिलावामध्ये मनजित चिल्लर याने जबरदस्त वर्चस्व राखले. त्याला जयपूर पिंक पॅन्थरने 75.5 लाख रुपयांची किंमत देऊन आपल्या संघात घेतले. तर, राजेश नरवाला याला उत्तर प्रदेश संघाने 69 लाख रुपयांना विकत घेतले आहे.

प्रो-कबड्डी लीगचे पाचवे सत्र जुलै 2017 पासून सुरु होणार आहे. या लीगमध्ये नवीन चार संघांचा समावेश करण्यात आला असून आधीच आठ संघ आहेत. दरम्यान, यासाठी दिल्लीमध्ये खेळांडूचा लिलाव सुरु असून यामध्ये 400 खेळाडूंनी भाग घेतला. प्रत्येक संघ आपल्या संघात 18 ते 25 खेळाडू विकत घेऊ शकतात. आत्तापर्यंत झालेल्या लिलावात खेळाडून मनजित चिल्लर याला जास्त बोली लावण्यात आली. त्याला जयपूर पिंक पॅन्थरने 75.5 लाख रुपयांची किंमत देऊन आपल्या संघात घेतले. तर, राजेश नरवाला याला उत्तर प्रदेश संघाने 69 लाख रुपयांना विकत घेतले आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंवर अद्याप बोली लावण्यात आली नाही. प्रत्येक संघाला खेळाडू विकत घेण्यासाठी 4 कोटींपर्यंतची मर्यादा घालण्यात आली आहे.

सर्वाधिक बोली लागलेले मुख्य खेळाडू
मनजीत चिल्लर – 75.5 लाख (जयपूर पिंक पॅन्थर) राजेश नरेवाल – 69 लाख (उत्तर प्रदेश) कुलदीप सिंह – 51.5 लाख (यू मुम्बा) संदीप नरेवाल – 66 लाख (पुणेरी पल्टन) सचिन शिंगाडे – 42.5 लाख (पुणेरी पल्टन) विशाल माने – 36.5 लाख (पुणेरी पल्टन) राकेश कुमार – 45 लाख ( तेलुगू टायटन) रण सिंग – 45.5 लाख (बंगळुरु वॉरियर्स)