बीजिंग: चीनच्या सरकारी वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ या वृत्तपत्राने मोदींच्या कामाचे कौतुक केले असून, मोदींनी केलेली आर्थिक सुधारणा, भारतात काही क्षेत्रात केलेली प्रगती कौतुक करण्यासारखी आहे असे म्हटले आहे. चीनची अर्थव्यवस्था १३.६ ट्रिलियन झाली असून भारत 2.८ट्रिलियन जवळ आहे. त्या मुळे भारताने आपला वृद्धीदर वाढवावा असेही या वृत्तपत्राने म्हटले आहे.
गेल्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती पडल्या असून, भारत दरवर्षी यावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असतो. भारतीय अर्थव्यवस्थेला ग्लोबल उर्जेच्या किमतीत फायदा झाला आहे, असे चीनने म्हटले आहे.
मोदींनी केलेल्या नोटाबंदी, कर सुधारण्यासारख्या गोष्टी केल्याने सामान्य लोकांना थोडा धक्का बसला, पण त्या गोष्टी स्वाभाविक असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.