नवी दिल्ली । डोकलाम वादावर तोंडफोड झाल्यानंतर चीनकडून भारताविरोधात नवी खेळी सुरु आहे. यावेळी चीनने आपल्या देशात तयार झालेल्या मोबाईल अॅपला अस्त्र बनवले आहे. ज्या माध्यमातून भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकार्यांचा डेटा चोरी केला जात आहे. याबाबतचा एक अहवाल नुकताच आयबीकडून देण्यात आला आहे. आयबीने दिलेल्या अहवालानुसार, ट्रूकॉलर, णउ ब्राउजर, शेअर-इट, क्लीन मास्टरसारख्या 42 मोबाईल अॅपवरुन भारतीय लष्कराच्या अधिकार्यांची गुप्त माहिती चीनच्या सर्व्हरवर संकलित केली जाते. डोकलाम प्रश्नी तोंडफोड झाल्यानंतर चीनचा पोटशूळ उठला आहे.