चीनला धडा शिकविण्यासाठी चीनी वस्तुंवर बहिष्कार टाका

0

शहादा। येथील वसंतराव नाईक माध्य. व उच्च माध्य. विद्यालयातील समर्थ सभागृहात राष्ट्रीय स्वदेशी – सुरक्षा अभियाना अंतर्गत स्वदेशी भारत समर्थ भारत या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जळगाव विभाग प्रचारक निलेश गजरे, जिल्हा जागरण समिती सहयोगी कपील शहा, भगवान अग्रवाल,संजय कासोदेकर, गोरख तांबोळी, गणेश धाकड ,पियुष चोरडिया वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य आर. जे रघुवंशी पर्यवेक्षक सुनिल सोमवंशी आदि मान्यवर उपस्थित होते. निलेश गजरे म्हणाले चिन ह्या देशामुळे आपल्या भारत देशाला फार मोठा धोखा आहे. प्रथम चिनने 37500 चौकिमी च्या भाग ताब्यात घेतला व नंतर 1965 च्या पाकिस्तान युध्दात एकुण 42770 चौ. किमी च्या भूभाग ताब्यात घेतला आहे. जगाचा पाठीवर दोन धृवापैकी एक धृव अमेरिका आहे तर दुसर्‍या धृवावर वर्चस्व गाजविण्यासाठी चिन भारताला शह देवु पहात आहे.

बंदी असलेल्या उत्पादनांची देशात सर्रांस विक्री
जगभरात ज्या प्रॉडक्टला बंदी आहे ती आपल्याकडे सर्‍हास विकत घेतली जात आहे. जीएसटीमुळे चिनी वस्तु देखील महागणार आहेत. मेक इन इंडियामुळे मोबाईल तयार करणे शिकलो आहेत. आता मेक इन इंडिया ऐवजी मेक बाय इंडिया झाला तर आपण ही व्यापार करु शकतो. आपण देश भक्त झालो व चिनी मालावर बहिष्कार टाकला तर चिनचे कंबरडेच मोडले जाईल असा आशावाद त्यांनी यावेळी मांडला.

चीनी व्यापारात घट
भारत दररोज चिनला व्यापाराचा माध्यमातून 1600 कोटी रुपये मिळवुन देतो. तर वर्षभरात 6 लाख कोटी रुपया पर्यंतचा व्यापार मिळवुन देतो. पुढे ते म्हणाले की प्रकाश चावला जे खेळ उद्योगाचे प्रमुख आहेत त्यांनी भिती व्यक्त केली आहे की वर्षभरात अडीच हजार कोटीचा व्यापार होत होता. तो आता तीस टक्यावर आला आहे. अशामुळे ठाण्यात व भिवंडीत 70% लोक बेरोजगार झाले आहेत.

स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवा
भारत 60% व्यापार हा चिन जवळ करतो तर उरलेला 40% व्यापार हा इतर देशासोबत करतो. आता मोबाईल जरी चिनचा वापरत असाल तरी प्रचार स्वदेशाचा करा. नंतर विध्यार्थ्याना प्रश्न विचारण्यासाठी पाच मिनिटे देण्यात आली. यात विध्यार्थ्यांचा प्रशानचे समाधान करण्यात आले. शेवटी सामुहीक प्रार्थना म्हटली . सूत्रसंचालन सुनिल सोमवंशी यानी केले. यशस्वीतेसाठी प्रा. डी.के. माने, प्रा. एम. पी. पवार, प्रा. एन. डी. निझरे, ए. एम. वळवी आदींनी कामकाज पहिले.