नवी दिल्ली – चीनने १ बिलियन डॉलर कर्ज पाकिस्तानला देण्याची तयारी दर्शविली आहे. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफए) पाकिस्तानला ‘ग्रे’ लिस्टमध्ये कायम ठेवण्याचा निर्णयानंतर चीनचा निर्णय समोर आला आहे. त्यामुळे ‘एफएटीए’चा दबाव झुगारून चीनने केलेली मदत दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडू शकते.
दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या आर्थिक रसदींवर लक्ष ठेवणाऱ्या फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला ‘ग्रे’ लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानची बदनामी थांबावी, तसेच दबाव टाकू नये, असे चीनने म्हटले होते. चीनच्या निर्णयानंतर अमेरिकेच्या भूमिककडे आंतरराष्ट्रीय वर्तृळाचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानची पाठराखण
संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निकी हॅले यांनी आपल्या भारतभेटीवेळी पाकिस्तानला दहशतवाद्यांचा स्वर्ग संबोधले होते. पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याच्या निर्णयामुळे चीनच्या प्रकल्पांवर बंधने येणार आहे. चीनने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. विदेशी भांडवल उभारणीवर येणाऱ्या मर्यांदामुळे विकासप्रकल्पांना खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनने पाकिस्तानची पाठराखण केल्याचे बोलले जात आहे.