यावल : तालुक्यातील चुंचाळे येथे सोशल डिस्टन्सचे पालन करीत व मोजक्या सात लोकांच्या उपस्थितीत आदर्श विवाह पार पडला. अत्यंत साध्या पद्धतीने व अनावश्यक खर्चाला फाटा देत आदर्श विवाह घरातच पार पडला. माणिक नारायण पाटील (राजपूत) यांचे पुत्र नरसिंग व नंदीचे खेडगाव, ता.पाचोरा येथील कृष्णा नरसिंग पाटील यांची सुकन्या वैष्णवी हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. यावेळी केवळ वर-वधूंसह वधू व वराचे आई-वडील, मामा, ब्राम्हण अशा मोजक्या लोकांची उपस्थिती होती. यावेळी फिजीकल डिस्टन्सचे पालन तसेच मास्कचा वापर करण्यात आला. या आदर्श विवाहाचे चुंचाळेसह परीसरात कौतुक होत आहे.