चुंचाळे येथील वृद्धाची आजारास कंटाळून आत्महत्या

0

चुंचाळे- गावातील नारायण आनंदा पाटील (62) यांनी आजारास कंटाळून रविवार, 5 रोजी पहाटे गावाजवळील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. घरातून ते बाहेर पडल्यानंतर दोन तास होवूनही घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू केला असता त्यांचा मुलगा सुकलाल पाटील यांनी शेजारील गावात व शेतात नातलगांना त्याबाबत माहिती दिल्यानंतर गावाशेजारील माजी सरपंच जिजाबराव पाटील यांच्या शेतातील विहिरीवर बुट व त्यांची काठी दिसून आल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. याबाबत पोलिस पाटील गणेश साहेबराव पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सुनील तायडे करीत आहेत. मृत नारायण पाटील यांच्या पश्‍चात तीन मुले, दोन भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे.