चुंचाळे येथील 45 वर्षीय महिलेस सर्पदंश

0

यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील एका 45 वर्षीय महिलेस सर्पदंश झाल्याने तिला अत्यवस्थ अवस्थेत यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. जिजाबाई संतोष पाटील असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या शनिवारी केळी बागात कामाला गेल्या असता सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या डाव्या हाताच्या बोटास विषारी सापाने चावा घेतला. यावलला डॉ. रश्मी पाटील, पल्लवी सुरवाडे यांनी प्रथमोपचार केले व प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिक उपचारार्थ हलवण्यात आले आहे.