चुंचाळ्यात उद्यापासून श्रीमद् भागवत कथा संकीर्तन सप्ताह

0

चुंचाळे- श्री समर्थ सुखनाथ बाबा, रघुनाथ बाबा, वासुदेव बाबा यांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या भूमीत 13 नोव्हेंबरपासून संगीत भागवत कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाला सुरुवता होत आहे. श्रीमद भागवत कथेचे वाचन राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.गजानन महाराज (धानोरा) हे करतील.

दररोज विविध धार्मिक कार्यक्रम
या भागवत संकीर्तन सप्ताहास आठ दिवस महाराज येथील श्री सुनील नेवे एकता फाऊंडेशनतर्फे देण्यात आले आहेत. पहाटे पाच ते सहा काकडा आरती, 8 ते 11 व दुपारी दोन ते चार कथा पारायण, संध्याकाळी पाच ते सहा हरीपाठ, रात्री 8 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम होईल. 13 रोजी ह.भ.प.तुकाराम महाराज, 14 रोजी पांडुरंग महाराज, 15 रोजी कविता महाराज, 16 रोजी सुकदेव महाराज, 17 रोजी अरुण महाराज, 18 रोजी माधव महाराज, 19 रोजी दीपक महाराज, 20 रोजी ह.भ.प. गजानन महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. गायनाचार्य ह.भ.प.पाडुरंग महाराज, हिंमत महाराज, शिवदास महाराज, मुकेश महाराज, विणेकरी मुकुंदा महाराज, मृदुगांचार्य शिवदास महाराज, रमेश महाराज, प्रकाश महाराज, सरदार महाराज आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ह.भ.प.प्रल्हाद राजपूत, अरुण कोळी, नथ्थु धनगर, मनोहर कोळी, सुधाकर चौधरी, संजय कोळी यांच्यासह चुंचाळे व बोराळे ग्रामस्थ परीश्रम घेत आहेत.