नवी दिल्ली । आयपीएलनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार 25 एप्रिलपर्यंत संभाव्य संघाची घोषणा करायची आहे. या संघामध्ये निवडीसाठी भारतीय संघात मोठी चुरस असून कुणाची निवड होते आणि कुणाला डच्चू मिळतो, याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे. द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांनी आपल्या संभाव्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडमध्ये 1 जून ते 18 जून 2017 दरम्यान होणार्या स्पर्धेसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. एकूण 15 सामने होणार आहेत. त्यासाठी 2 गट पाडण्यात आले असून, प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरी गाठतील. अंतिम सामना 18 जून रोजी ओव्हेल मैदानात होईल. ऑस्ट्रेलिया, यजमान इंग्लंड, बांगलादेश, आणि न्यूझीलंड यांचा अ गटात समावेश आहे. तर ब गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि द. आफ्रिका संघाचा समावेश आहे. विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल राहुल, युवराज सिंग, एम.एस. धोनी, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहमद्द शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, मनिष पांड्या आणि यजुवेंद्र चहल यांची एन्ट्री जवळपास निश्चित मानली जात असून हे खेळाडू मुख्य दावेदार आहेत.
ऑस्ट्रेलिया, बांगलादेशचे संघ
मेलबर्न/ढाका: ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपापले संघ जाहीर केले. ऑस्ट्रेलियाने संघात स्टार्क, पॅटिन्सन, हेजलवूड आणि कमिन्स या चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिले असून अष्टपैलू फॉल्कनरला डच्चू दिला. ऑस्ट्रेलिया इंग्लंड, बांगलादेश, आणि न्यूझीलंड यांचा अ गटात समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया संघ- स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, अॅरोन फिंच, जॉन हेस्टिंग्स, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, ख्रिस लीन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स पॅटिन्सन, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा.
बांगलादेश संघ- मशरफी मूर्तझा (कर्णधार), तमिम इक्बाल, इमरुल कायेस, सौम्या सररकार, शकिबुल हसन, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, सब्बीर रहमान, मोसादेक हुसैन, संजामुल इस्लाम, मुस्तफिझूर रहमान, तास्किन अहमद, रुबेल हुसेन, मेहदी हसन आणि शफिऊल इस्लाम. 1 जून – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (ओव्हल) 2 जून – न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन) 3 जून – श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल) 4 जून – भारत विरुद्ध पाकिस्तान (एजबॅस्टन) 5 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (ओव्हल) 6 जून – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (कार्डीफ) 7 जून – पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (एजबॅस्टन) 8 जून – भारत विरुद्ध श्रीलंका (ओव्हल) 9 जून – न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (कार्डीफ) 10 जून – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन) 11 जून – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल) 12 जून – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (कार्डीफ) 14 जून – सेमीफायनल 1 (कार्डीफ) 16 जून – सेमीफायनल 2 (एजबॅस्टन) 18 जून – फायनल मॅच (ओव्हल)