मुंबई : चेंबूरमध्ये बिल्डरने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संजय अग्रवाल असं आत्महत्या करणाऱ्या बिल्डरचे नाव असून सिंधी कॉलनी येथील त्यांच्या ऑफिसमध्ये सदरील घटना घडली. आत्महत्ये मागचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान चेंबूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे.
चेंबूरमधील प्रसिद्ध बिल्डर संजय अग्रवाल ( वय ५७ ) हे संजोना विकासकचे मालक आहेत. आत्महत्येनंतर संजय अग्रवाल यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.