चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल !

0

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखाना प्रकरणात राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह दोन जणांवर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तळणी येथील शेतकरी मुंजा गिते यांची जमीन साखर कारखान उभारणीसाठी घेतली होती. मात्र, त्यांना दिलेला चाळीस लाख रुपयांचा धनादेश न वटल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासह इतरांवर बर्दापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, कारवाई होत नसल्याने गिते यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

अंबाजोगाईतील तळणी गावात राहणाऱ्या मुंजा गिते यांची जवळपास तीन हेक्टर जमीन जगमित्र साखर कारखान्यासाठी ५० लाखांत खरेदी करण्यात आली होती. व्यवहारात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याला कारखान्याने अगोदर एक लाख आणि काही दिवसांनी ७ लाख ८१ हजार २५० रुपयांचा चेक दिला गेला. शिवाय या साखर कारखान्यात गिते यांच्या मुलासहीत आणखी चौघांना नोकरी देण्याचीही हमी देण्यात आली होती.