शिंदखेडा । चेक बाऊन्स प्रकरणातील संशयित आरोपी राजू तानका मोरे यांची सबळ पूराव्या अभावी शिंदखेडा न्यायालयाने निर्दोष मूक्तता केली. सात महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागला. अॅड.किशोर भामरे संशयितांचे वकील म्हणून कामकाज पाहिले. या प्रकरणातील तक्रारदार अतूल नाथसाहेब गलांडे आहेत. गलांडे हे सोलापूर जिल्ह्यातील कोंढार चिंचोली येथील राहणारे आहेत. मात्र नोकरी निमित्ताने ते धुळे जिल्ह्यातील वलवाडी येथे राहतात. नोकरीनिमित्ताने ते शेतीकडे लक्ष देवू शकत नव्हते. त्यामूळे त्यांना शेतीकाम करण्यासाठी सालदाराची गरज होती. विठ्ठल गिरासे यांनी दूसाने येथील राजू तानका मोरे (50) यांचे नाव सूचविले. त्यांच्या माध्यमातून गलांडे मोरेंकडे गेले. त्यांना कामाची माहीती दिली.
कामाची रक्कम
गलांडे यांच्या तक्रारीनूसार मोरे यांनी कामास होकार देत माझ्या ऐवजी मूलाला पाठवेन असे सांगीतले. त्यानूसार जूलै 2016 मधे गलांडे यांनी मोरे यांना एक लाख रूपये अॅडव्हान्स म्हणून रक्कम दिली. त्यानंतर मोरे यांची पत्नी आजारी असल्याने तिच्या उपचारासाठी पून्हा 1 लाख 40 हजार रूपये अॅडव्हास म्हणून दिले. त्यानंतरही मोरे यांनी शेतीकामाकरीता सालदार म्हणून आपल्या मूलाला पाठविलेच नाही, आणि पाठवणार नाही अशी भूमिका घेतली. शिवाय घेतलेली अॅडव्हान्स रक्कम 2 लाख 40 हजार रूपये परत करण्यासही नकार दिला. गलांडे यांनी सदर चेक बॅकेत जमा केला असता पूरेशा रकमेअभावी चेक परत आला. त्यानूसार मोरे यांना याबाबत वारंवार सांगूनही त्यांनी रक्कम जमा केली नाही. शेवटी 1 में 2017 रोजी गलांडे यांनी मोरे यांना रितसर नोटीस दिली आणि 14 जून 2017 रोजी शिंदखेडा न्यायालयात धाव घेतली. 17 जानेवारी रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. पूरेशा पूराव्याअभावी या प्रकरणातील संशयित आरोपी मोरे याची न्या.पी एस.भंडारी यांनी निर्दोष मूक्तता केली आहे.