चैतन्य तांडा ग्रामपंचायतीत कोव्हिशिल्डचे शंभर टक्के लसीकरण

चाळीसगाव| कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने कोव्हिशिल्डचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण केला आहे. त्यामुळे शंभर टक्के लसीकरण म्हणून तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने १८ वर्षांवरील सर्वांचे कोव्हिशिल्डचा पहिला डोस पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे शंभर टक्के लसीकरण झालेल्या तालुक्यातील पहिली ग्रामपंचायतीचा बहुमान मिळाला आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांना संचार करण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून ३२० जणांना युनिव्हर्सल पास वितरीत करण्यात आले असून लवकरच दुसऱ्या डोस बरोबर बुस्टर डोस दिला जाणार असल्याचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी सांगितले आहे.
यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम राठोड, आरोग्य सेविका ज्योती गांगुर्डे, आरोग्य सहायक संदीप पाटील, मदतनीस ज्योती राठोड, आशाताईं कविता जाधव,
सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंद राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, भाऊलाल चव्हाण, राजेंद्र चव्हाण, संदीप पवार, साईनाथ राठोड, प्रवीण चव्हाण व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.