चॉपर घेवून फिरणार्‍यास अटक

0

जळगाव । गेंदालाल मिल परिसरात मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास चॉपर घेऊन दहशत माजवणार्‍या युवकाला शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली.

त्याच्यावर गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.गेंदालाल मिल परिसरातील लक्ष्मण उर्फ लक्ष्या अशोक भदाणे हा मंगळवारी गेेंदालाल मील भागात शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ चॉपर घेऊन शिविगाळ करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्याला अटक केली.