चोपडा आमदार लता सोनवणे यांना दिलासा नाहीच : जात प्रमाणपत्राबाबतचा खंडपीठाचा निकाल सुप्रीम कोर्टातही कायम
There is no relief for Chopra MLA Lata Sonawane: the verdict of the bench regarding the caste certificate is upheld in the Supreme Court as well. जळगाव : जात वैधता प्रमाणपत्रबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवल्याने चोपडा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे यांना दिलासा मिळाला नसलयाची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिली आहे.
‘सुप्रीम’दिलासा नाहीच
जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात शुक्रवार, 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या.के.एम.जोसेफ व न्या.ऋषिकेश रॉय यांनी जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला. जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात हायकोर्टाने आमदार सोनवणे यांची याचिका फेटाळल्याने सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती.
माजी आमदारांनी केली तक्रार
आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी तक्रार दिली होती. आमदार लता सोनवणे यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती.
काय आहे प्रकरण?
लता सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या असून माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे चौकशीचे आदेश दिले होते.