चोपडा एज्युकेशन सोसायटी शताब्दी वर्षानिमित्त तंत्र प्रदर्शन

0

चोपडा । येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व उच्च माध्यमिक व्यावसायिक शिक्षण-प्रशिक्षण विभाग या दोघांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे व्यावसायिक शिक्षण काळाची गरज व विज्ञान- तंत्रज्ञान होणार्‍या अवाढव्य बदलांना डोळ्यासमोर ठेवून एक आदर्श व्यवसायिक व तंत्र कौशल्य प्राप्त विद्यार्थी निर्माण करणे हा निश्‍चित उद्देश समोर ठेवून शताब्दी महोत्सवानिमित्त या तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव माधुरी मयूर यांनी केले. प्रदर्शनात सुंदर अशी उपकरणे मांडण्यात आली होती. सचिव माधुरी मयूर यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक करतांना आतापर्यंत विज्ञान किंवा सर्व विषयांचे प्रदर्शन बघितले होती. परंतू शेती व इतर औद्योगिक क्षेत्राची गरज ओळखून आपल्या कल्पनांना विस्तार देऊन आपण मांडलेल्या या तंत्र प्रदर्शनाने शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती घडुन येण्यास आता जास्त वेळ लागणार नाही असे मत व्यक्त केले.

विविध तंत्रांचा समावेश
या प्रदर्शनात मिनी लेथ मशीन, हॅड्रोलिक लिफ्ट,लहान ड्रील मशीन,पेरणी यंत्र, कोळपणी यंत्र, रूम हिटर, स्वयंचलित थ्री फेज मोटार, मोटारसायकल इंजिन मॉडेल यासोबत आय. टी. आय. मधील जोडारी, वीज तंत्री यांचे पायाभूत कौशल्यातून विकसित केलेले मॉडेल, एच. एस. सी. विभागातील मॉडेल होते. या प्रदर्शनाला सर्व सदस्य, कार्यकारिणी संचालक प्रताप विद्या मंदिराच्या मुख्याध्यापक अरुणा पाटील, उपप्राचार्य डी.एस.पांडव,बी.एड.चे प्राचार्य एम.पी.पाटील,डी.एड.चे प्राचार्य किरण पाटील, सर्व विभागातील पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

उपकरणांचा सजीव देखावा
आय.टी.आय.चे प्राचार्य ए. एच. अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.सी.चाचरे, एच.बी.पाटील, ए.सी.डुडवे, डी.आर.पाटील, एस.के.पाटील, बी. जे. पवार, एम. पी. चौधरी यांनी सुमारे 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तांत्रिक उपकरणांची नियोजन बद्ध मांडणी केली .एच एस.सी.विभागातुन प्रा.एम.बी.चौधरी,पी.आर.सोनार यांच्या सहकार्याने 50 उपकरणांचा सजीव देखावा तयार करण्यात आले होते. उल्हास गुजराथी, गोविंद गुजराथी यांच्या मार्गदर्शनाने आय.टी.आय. मधील सर्व निदेशक यांनी परिश्रम घेतले.