चोपडा कृउबात व्यापार्‍यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र खोटे आढळले

0

चोपडा। येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा येथे व्यापार करण्याचा परवाना मिळविण्यासाठी सादर केलेले प्रतिज्ञापत्र ऑनलाइन तपासणी केली असता 270 प्रतिज्ञा पत्रांपैकी 266 खोट्या नावाची आढळले आहेत. याबाबत कृउबा संचालक धनंजय पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी व मार्च महिन्यात सर्व व्यापारी वर्ग बाजार समितीत व्यापारी परवाने नूतनीकरण करून देत असतात त्यासाठी नवीन प्रतिज्ञापत्रे व करारनामा करून घ्यावे लागतात त्यात ऑनलाइन पडताडणी केली असता भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.

मार्च व एप्रिल 2017 या कालावधीतील 270 करारनामे व प्रतिज्ञापत्रे करण्यात आले असून आपण याची ऑनलाइन पडताळणी केली असता त्यापैकी 266 प्रकरणे खोटे आढळून आले. यामध्ये प्रतिज्ञापत्रांच्या तारखा, व्यक्ती, स्वाक्षरीकर्ता यापैकी कुठलीही माहिती जुळून आली नाही. या अनियमिततेमुळे शासनाचा लाखोंचा महसुल बुडत आहे. यासर्व घोळास जबाबदार असलेले चोपडा सेतू चालक, तहसीलदार, चोपडा सेतू विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख निवासी जिल्हाधिकारी यांच्या संगांमताशिवाय हा प्रकार शक्यच नाही

तरी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येऊन संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली असून यापूर्वीही अशाच स्वरूपात तक्रारी करण्यात आली आहे तरी कारवाई करण्यात कुचराई होत आहे. नूतन जिल्हाधिकारी यांनी यात विशेष लक्ष घालून तात्काळ कारवाई कारवाई अशी मागणी कृउबा संचालक धनंजय पाटील, नारायण पाटील, भरत पाटील व भाजपा माजी शहराध्यक्ष रवींद्र बडगुजर यांनी पत्रकार परीषदेत दिली केली आहे.