चोपडा : चोपडा तालुक्यातील एका गावात राहणार्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पीडीता घरी असताना अत्याचार
चोपडा तालुक्यातील एका गावात आठवीचे शिक्षण घेणारी 14 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार, 6 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना गावातील संशयीत आरोपी धीरज रवींद्र फुगारे (18) हा घरात आला. पीडीतेचा विनयभंग करीत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडीतेने नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर अडावद पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर आरोपीविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.