चोपडा । महामंडळाच्या एपीओ, जळगाव फार्मर्स कंपनी यांच्यातर्फे कृउबा समिती आवारातील वखार महामंडळाच्या गोदामाजवळ तुर खरेदी केंद्रावर तुर देणार्या शेतकर्यांना धनादेशद्वारे नऊ लाख रुपये वितरण करण्यात आले. प्रास्ताविक कार्यकारी अधिकारी एस.बी.पाटील यांनी करतांना सांगितले की, दिड हजार क्विंटल तुर खरेदी झाली अजून तेवढीच होईल. शेतकरी प्रशिक्षण व शेतकर्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाण्यासाठी कंपनीचे प्रयत्न आहेत. डॉ.सुरेश पाटील व्यापारी व शेतकरी एकत्र येतात हे चांगले लक्षण आहेत. प्रा.अरुणभाई गुजराथी म्हणाले की, केळीमुळे गेल्यावर्षी त्रास झाला. यंदा भाव चांगले आहेत. कंपनी वाढावी, शेतकर्यांला चांगले बियाणे, चांगले उत्पादन, भरपूर भाव व तातडीने पेमेंट देण्याचे काम सहकार्य करणारे ठरेल.
धनादेश वितरण प्रसंगी यांची होती उपस्थिती
माजी आ.सुरेश पाटील,माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. संदीपभैया पाटील, कृउबा सभापती जगन्नाथ पाटील, उपसभापती नंदकिशोर पाटील, पीपल्स बॅक चेअरमन चंद्रहास गुजराथी, भाजप नेते घनःश्याम अग्रवाल, विश्वासराव पाटील औद्योगिक वसाहत चेअरमन राजू शर्मा आदी उपस्थित होते. स्वागत जळगाव फार्मर्स कंपनीतर्फे भरत पाटील, भोई, सुरेश गुजराथी, साहेबराव भालेराव, पाठक, एकनाथ पाटील, निलेश पाटील, डी.टी.पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ.सुभाष देसाई, अॅड.हेमचंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील, भागवत महाजन, यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन डॉ.रवींद्र निकम यांनी केले.