चोपडा । नगरपरिषदेने शहर उघड्यावर असलेली हागणदारी मुक्त केल्याने शहरातील नागरिक खाजगी अथवा सार्वजनिक सुलभ शौचालयाचा वापर करीत आहेत. म्हणून राज्यस्तरीय समितीने चोपडा शहरात फिरून सर्वत्र पाहणी केली. सदर समितीने 26 व 27 एप्रिल असे सलग दोन दिवस पाहणी करण्यात आली. या समिती नाशिक येथील उपायुक्त (प्रशासन) विजय पगार, नाशिक महापालिकेतील जिल्हा प्रशासन अधिकारी, उदय कर्बलपूर व योेगेंद्र दोरकर यांचा समावेश होता. या समितीने शहरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. मल्हारपुरा, आशा टॉकीज, रामपुरा विटभट्ट्याजवळील तात्पुरते शौचालय तर अलकरिवाडा, शेतपुरा, सुंदरगढी, फकीरवाडा, अरूणनगर, हमीदनगर भागातील सुलभ शौचालये आणि उपजिल्हा रूग्णालय, कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, प्रताप विद्या मंदिर आदी भागात समितीने शौचालयांच्या स्थितीची पाहणी केली. समितीने हागणदारीमुक्त शहराबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा मनिषा चौधरी, उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटनेते जीवन चौधरी, आरोग्य सभापती अशोक बाविस्कर, कार्यालय अधिक्षक आर.एम.जाधव, स्वच्छता निरीक्षक व्ही.के.पाटील, लेखा परिश्रम महेंद्र पाटील, मनोहर बाविस्कर, पर्यवेक्षक बी.एल.पवार, वसंत शिरसाठ आदी उपस्थित होते.