चोपडा : चोपडा नगरपरिषेदेच्या मुख्याधिकारी म्हणुन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सचिन उंध्दासे यांचाकडे 26 जानेवारीपर्यंत पदभार देण्यात आला आहे. त्यानी 15 डिसेंबरपासुन कामकाजाला प्रारंभ केला असून त्यांचा स्वागतपर सत्कार नवनिर्वाचित नगराध्यक्षा मनिषा चौधरी, नगरसेवक जिवन चौधरी यांनी केला. नगरपरिषदेच्या बैठक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सचिन उंध्दासे यांनी आपला परिचय करून दिला. त्यानंतर गणेश पाठक यांनी उपस्थित नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांचासह नगरसेवकांचा परिचय करून दिला.
यांची होती उपस्थिती
यावेळी सचिन उंध्दासे यांनी स्वच्छता व शौचालय याचावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्षा मनिषा चौधरी, नगरसेवक जिवन चौधरी, रमेश शिंदे, अशोक बाविस्कर, नारायण बोरोले, कैलास सोनवणे, गजेंद्र जैस्वाल, हुसेन पठाण, सुरेखा माळी, सुप्रिया सावंत, सरला शिरसाठ, दिपाली चौधरी, शोभाबाई देशमुख, विमलबाई साळुंके, श्रावगी सिमा यांचासह कार्यालय अधिक्षक रवी जाधव, नगर अभियंता चौधरी, पाणी पुरवठा अभियंता वाघ, अनुप अग्रवाल राजु बाविस्कर, यशवंत पाटील, अनिल चौधरी, जगदिश लाड आदी उपस्थित होते.