चोपडा पालिकेच्या विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन

0

चोपडा । येथील नगरपरिषदेने माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या अमृत महोत्सवाचे निमित्ताने शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपुजन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्ता कराडे व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी न.पा.सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले. यावेळी स्वागत नगराध्यक्ष मनीषा चौधरी,उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख,गटनेते जीवन चौधरी,विरोधी पक्षाचे गट नेते महेश पवार यांनी केले. मंचावर कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, भाजप नेते घनःश्याम अग्रवाल आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी अग्नीशमन बळकटीकरण अंतर्गत फायर स्टेशन वरील कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले.तसेच जवळील अधिकारी निवासस्थानाचे उदघाटन करण्यात आले. नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना अंर्तगत महात्मा गांधी उद्यान ते लोहाणा पेट्रोल पंप,आणि यावल नाका ते भवानी मंदिर टप्पा 1 च्या रस्त्याचे कामांचे भुमिपुजन करण्यात आले. त्याचप्रमाणे शेखपूरा उर्दू शाळेजवळील तीस सीटच्या संडास युनिटचा भुमिपुजन देखील करण्यात आले. यावेळी नगरसेवक गजेंद्र जयस्वाल, गटनेता महेश पवार, किशोर चौधरी, राजाराम पाटील, अशोक बाविस्कर, भुपेंद्र गुजराथी, रमेश शिंदे, डॉ.रविंद्र पाटील, दिपाली चौधरी, कृष्णा पवार, सुरेखा माळी, सुप्रिया सनेर, सरला शिरसाठ, सीमा जैन, शोभाबाई देशमुख, संध्या महाजन, मिनाबाई शिरसाठ, आशालता मराठे, आश्विनी गुजराथी, पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, प्रविण गुजराथी, आशिष गुजराथी, कृउबा सभापती जगन्नाथ पाटील, असगर अली सैय्यद, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, प्रांतधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार दिपक गिरासे आदी उपस्थित होते.