चोपडा पोलिसांनी अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले

चोपडा : शहरातील काजीपुरा परीसरात अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडत दहा गुरांची सुटका केली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दहा गुरांची सुटका
शहरातील काजीपुरा परीसरातून मध्यरात्री अवैधरीत्या निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणारा मिनी ट्रक (एम.एच.46 ई.5162) पोलिसांनी पकडला. यात कसून चौकशी केली असता 10 गुरे असल्याचे उघडकीला आले. पोलिसांनी वाहन जप्त केले तर या प्रकरणी कॉन्स्टेबल राकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी संतोष प्रकाश चौधरी (32, किस्मत नगर, शिरपूर, जि.धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तपास हवालदार लक्ष्मण शिंगाणे करीत आहे.