चोपडा प्रताप विद्यामंदीरतर्फे शहरातून शोभ यात्रा

0

चोपड़ा : येथील चोपडा एज्यूकेशन सोसायटी संचालित प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त भव्य दिव्य शोभयात्रेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अश्वआरूढ़ ध्वजधारी विद्यार्थ्यांमागून नउवारी साड्या परिधान केलेल्या कलशधारी विद्यार्थिनी, लेझीम पथक, बॅन्ड पथक, चित्ररथ, सजीव देखावे तसेच पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, नागलवाडी विद्यालय, इंग्लिश मेडियम, उर्दू विभाग, शेतकी आयटीआय, डीटीएड, बी.एड. आदि विद्याशाखांचे पदाधिकारी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी आपापल्या गणवेशात व माजी विद्यार्थी निवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त एनसीसी, स्काऊट गर्ल गाइड, आरएसपीच्या विद्यार्थ्यानी उत्कृष्ट संचलन केले. यापूर्वी शाळेच्या 99 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेच्या सचिव माधुरी मयूर यांनी केले.

आजी माजी शिक्षकांसह मुख्यध्यापकांची उपस्थिती
इयत्ता 9वीच्या सर्व तुकड्यांमधुन प्रथम आलेली अनुश्री गुजराथी हिच्याहस्ते ज्योत संचलन करण्यात आले. उद्घाटक अध्यक्ष म्हणून माधुरी मयूर यांनी सर्व शाखा पदाधिकारी व विद्यार्थाना शुभेच्छा दिल्या. यावेळी उर्मिला गुजराथी, चंद्रहास गुजराथी, भूपेंद्र गुजराथी, मोरेश्वर देसाई, किरण गुजराथी, प्रवीण गुजराथी, शैलेन्द्र अग्रवाल, आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन उपमुख्यध्यापक आर.बी.देशमुख यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डी.एस.पांडव, पर्यवेषक डी.व्ही.याज्ञिक, ए.टी.पाटील, डी.के. महाजन, नागालवाडी विभागाचे मुख्याध्यापक वाय.के.डिसवाल आदी उपस्थित होते.