चोपडा । येथील शतकपुर्ती वर्षात असलेल्या प्रताप विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी कृष्णा बापू लोहार याने टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या गणित विषयाच्या परिक्षेत 100 पैकी 91 गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकविला आहे. प्रताप शाळेचा गणित विषयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच इंग्रजी विषयाचा निकाल 75 टक्के लागला आहे.
इंग्रजी विषयात शाळेतुन मोहमद साद खाटीक 69 गुण मिळवून प्रथम आला आहे. या विद्यार्थ्यांना सचिन करमरकर व इरफान शेख या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे चोपडा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी, सचिव माधुरी मयूर, मुख्याध्यापिका अरूणा पाटील, पर्यवेक्षक आर.बी.देशमुख, डी.एस.पांडव, डी.के.महाजन, ए.ए.ढबू, गोविंद गुजराथी, उल्हास गुजराथी, केंद्र संचालक अतुल भट यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.