चोपडा येथे ट्रक रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू

0

चोपडा । चोपडा कृउबा समितीजवळ ट्रकने ऑटो रिक्षास धडक दिल्याने चालकासह दोघे प्रवासी जखमी झाले. त्यातील महिला अलकाबाई अनिल पाटील या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा धुळे येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. सकाळी 10.30 वाजता अंकलेश्‍वर बुर्‍हाणपूर महामार्गावर चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यावल रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वारासमोर ऑटो रिक्षा क्र.(एमएच 02 क्यूए 0198) ही बोरोले नगरकडून बसस्थानाकडे जात असताना सोमोरून महात्मा गांधी कॉलेजकडून येणारा (एचआर 55 जी 5289) या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक सचिन पांडुरंग पाटील, प्रवासी अनिल रामराव पाटील व अलकाबाई अनिल पाटील (सर्व रा. बोरोले 2 नगर) हे जखमी झाले त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील अलकाबाई अनिल पाटील या गंभीर जखमी झाल्याने आधी धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा तेथे उपचारादरम्यान 28 रोजी रात्री मृत्यू झाला. 29 रोजी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आला. याबाबत रिक्षा चालक सचिन पांडुरंग पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भालचंद्र बाविस्कर हे करीत आहेत.