चोपडा येथे बिअरने भरलेला ट्रक महाविद्यालयासमोर पलटला

0

चोपडा । यावल रोड वर बुधवारी 31 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास एम.एच01-एल-3332 ही मिनी ट्रक बिअर बॉक्स घेऊन जात असतांना पलटली. या ट्रकमध्ये किंगफिशर सह अन्य तीन ते चार कंपन्यांचे बीअरने बॉक्स होते. ट्रकचा मागील टायर गाडी पलटी झाल्याची घटना कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचा गेट समोर घडली आहे. यावेळी दहा ते पंधरा पोलीस कर्मचारी असूनही मुख्य रस्त्यावर गाडी पलटी झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाली होती. पोलीसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.

आडगाव येथील बस स्टॅन्ड वर मोहित बियर शॉपी मालक भाईदास भगवान माळी यांच्या मालकीचा बियरचा ट्रक 365 बियर चे खोके घेऊन नशिराबाद हुन आडगाव कडे येत असताना हा अपघात झाला. यातील काही खोक्यातील बाटल्या फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. भाईदास माळी, गोकुळ राठोड, चालक अझहर असे तिघही या ट्रकमध्ये होते. सुदैवाने कोणतीही जीवीत हाणी या अपघातात झाली नाही. रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.