चोपडा शहरातून चोरट्यानी क्रुझर लांबवली

चोपडा : शहरातील महात्मा फुले नगरातील रहिवासी सैयद तनवीर सैयद रहीम यांच्या घरासमोरून चारचाकी क्रुझर चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा
धरणगावातील गुजराथी गल्लीतील रहिवासी पवन सुरेश कासार यांच्या मालकीची चारचाकी चोपडा शहरातील महात्मा फुले नगरातील सैयद तनवीर सैयद रहीम यांच्या घरासमोर लावण्यात आली होती मात्र चोरट्यांनी साधारण पावणे चार लाख रुपये किंमत असलेली क्रुझर संधी साधून 9 रोजी रात्री लांबवली. या प्रकरणी गाडीचे मालक पवन सुरेश कासार यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक किरण गाडीलोहार करीत आहेत.