चोपड्याच्या नागपुरे बंधूंची चित्रे ‘ब्रेट ली’च्या संग्रहात

0

चोपडा । पुणे येथील आर्ट एंड क्राफ्ट या संस्थेतर्फे भरविण्यात आलेल्या कला प्रदर्शनात चोपडा येथील कलाशिक्षक कलावंत पंकज नागपुरे आणि वसंत नागपुरे या दोघा बंधूंच्या चित्रांचा समावेश करण्यात आला होता. पुणे येथील रेसीडेंसी क्लबमध्ये आयोजित भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्धघाटन जगप्रसिद्ध ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सोबत क्रीड़ा समीक्षक सुनंदन लेले हे उपस्थित होते. दोघा बंधूंच्या चित्रकृतींचे ब्रेट ली आणि सुनंदन लेले यांनी कौतुक केले. नागपुरे बंधूंनी भेट दिलेली चित्रे आपण आपल्या संग्रही ठेवू असे ब्रेट ली यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी वसंत नागपुरे व पंकज नागपुरे यांच्या चित्रांचे प्रदर्शन चोपड्यासह पुणे, मुंबई या ठिकाणी झाली आहेत.