चोपडा । राष्ट्रीय आरोग्य अभियान अतंर्गत जिल्हा रुग्णालय जळगाव व राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र शासन आदिवासी व ग्रामीण भागातील गरजु व गरीब रुग्णांसाठी 25 ते 28 फेब्रुवारी 2017 या दरम्यान येथिल उपजिल्हा रुग्णालयात सर्वरोग निदान व दंत तसेच शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परीषदेत प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात शिबीराचे आयोजन फक्त पाल, चोपडा येथे घेण्यात येत आहे.
या शिबीरामंध्ये अँपेडीक्स, हार्निया, मुतखडा, मुळव्याध, दातांच्या शस्त्रक्रिया, गर्भ पिशवी शस्त्रक्रिया, लहान मुलांचे शस्त्रक्रिया, शरीरावरील गाठी आदि विविध प्रकारच्या रोगांचे निदान व शस्त्रक्रियांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरीब गरजु रुग्णांनी शिबीराचा लाभ घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चोपडा तसेच तालुक्यातील गोरगावले, अडावद, चहार्डी, लासुर, हातेड, वैजापुर, धानोरा व यावल तालुक्याच्या भालोद, हिंगोणा, किनगांव, साकळी, सावखेडा, या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांनी आपली नावे नोंदणी करुन घ्यावयाची आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.