चोपडा । शहरातील फुले नगरमधील रहिवासी व महिला मंडळ विद्यालयातील विद्यार्थी दीपक शेटे (वय 8) हा आज दुपारी उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महिला मंडळ शाळेत इयत्ता दुसरीचा विद्यार्थी दीपक याने आज रविवार सुटीचा दिवस असल्याने दिवसभर आईला घरी पापडसाठी मदत केली होती. त्यामुळे फुलेनगरमधील गच्चीवर दिवसभर उन्हातकाम केल्याने त्याला अचानक काम संपल्यावर दुपारच्या चहासाठी दूध आणण्यासाठी सांगितले. त्यानंतरदुपारी 4.30 वाजेच्या सुमारास अचानक गच्चीच्या पयर्यांवर चक्कर येऊन जागीच मृत्यू झाला.