चोपड्यात व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

चोपडा । राज्यस्तरीय किसान क्रांती कृती समिती आयोजित महाराष्ट्र बंदला शेतकरी व चोपडा शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी उस्फूर्त पाठिंबा देत सहभाग नोंदवला. सकाळी कृती समितीचे राज्य समन्वयक एस.बी.नाना यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष अमृतभाई सचदेव यांच्या सहकार्याने चोपडा शहरात शेतकरी व व्यापार्‍यांनी पदयात्रा काढत सर्वांना बंदमध्ये सामिल होण्याची विनंती केली. यावेळी शहरातील सर्व व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेनेही या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला दिसला. संपुर्ण बाजारपेठेत शुकशुकाट होता. यावेळी अनिल वानखेडे, संजीव बाविस्कर, प्रवीण जैन, सचिन पवार, महेश सिंधी, सुवर्णसिंग राजपूत , दीपक चौधरी, संजीव सोनवणे, बाळासाहेब देशमुख, रविंद्र निकम, सचिन सोनवणे, अजित पाटील, राजेन्द्र जैन, प्रमोद पाटील, डॉ. राजेन्द्र सोनवणे, अ‍ॅड.एस डी पाटील, रमेश सोनवणे, डॉ.अजय करंदीकर, संजय श्रावगी, प्रमोद पाटील, सुंदरलाल सचदेव, जीवन पाटील, उदय पाटील, भरत पवार, प्रफुल्ल राजपूत, विजय बाविस्कर, कुलदीप राजपूत, डॉ.अरुण महाजन, डॉ. प्रकाश पाटील, शाम परदेशी, मुन्ना सोमानी, नरेंद तोतला, शाम परदेशी, बबलू पालिवाल, अजय कानडे, शाम सोनारसह शेकडो व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. सर्व सक्रीय सहभागी व्यापारी बांधवांचे आभार शेतकरी समितीचे राज्य समन्वयक एस.बी.नाना यांनी मानले.