चोरगावला पाडवानिमित्ताने भरणार मरीमातेची यात्रा

0

धरणगाव  । तालुक्यातील चोरगाव येथे अनेक वर्षापासून परंपरेने सुरु असलेली यात्रा दरवर्षी पाडवा निमित्ताने भरविली जाते. गावाचे दैवत असलेल्या मरिमातेची ही यात्रा असते. यादिवशी सायंकाळी बारागाडी ओढली जातात. मारीमातेच्या सर्व भक्तांकडून दिवसभर मिरवणूक काढून सर्व देवांची पूजा करण्यात येते. तसेच गावातील सर्व नागरिक सकाळपासून गावातील सर्व मंदिरांना पाण्याने स्वच्छ धुवून काढतात. त्यामुळे गावात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आनंदाचे वातावरण असते. दरवर्षी आयोजित होणारा यात्रोत्सव आनंदात पार पडण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत तर्फे यात्रा कमिटी तयार केली जाते. मात्र यावर्षी या कमिटी सोबत दक्षता समितीही तयार करण्यात आलेली आहे. यात्रेत बारागाडी व मरीमातेचे दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी विशेष नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.