चोरटे सैराटच : जळगावातून पुन्हा दुचाकी चोरीला

जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय असून सातत्याने दुचाकी चोरी होत असल्याने पोलिस प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा आहे. शहरातील गोलाणी मार्केट भागातून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी
विशाल शिवाजी पाटील (33, रा.रायसोनी नगर, जळगाव) हे खाजगी नोकरी करतात. शुक्रवार, 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने त्यांनी जळगावच्या गोलाणी मार्केट परीसरात दुचाकी (क्रमांक एम.एच.09 एन.आर.5057) लावली मात्र चोरट्यांनी ती लांबवल्याचे उघडकीस आले. जळगाव शहर पोलिस ठाण्यात शनिवार, 5 मार्च रोजी दुपारी एक वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.