Three houses were broken into at the same time in Pashtana : Dalla instead of lakhs धरणगाव : धरणगाव तालुक्यातील पष्टाणे गावातील किराणा दुकानासह तीन घरांना चोरट्यांनी टार्गेट केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. लाखो रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिणे चोरट्यांनी लांबवल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.
बंद घरांना केले टार्गेट
धरणगाव तालुक्यातील पष्टाणे गावातील तीन बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केले. चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबवला तर एक किराणा दुकान फोडण्याचा धाडसी प्रयत्न केला. तीनही घरांच्या चोरीतून लाखांच्या रोकडसह सोने चांदीचे दागिने लंपास झाल्याने खळबळ उडाली. धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत पंचनामा केला. पष्टाणेतील रहिवासी बना धोंडू पाटील, दिलीप रघुनाथ पाटील, पंढरीनाथ अंबक पाटील यांच्या घरात ही चोरी झाल्याचे सांगण्यात आले.