शिरपूर : तालुक्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून शेतात कापणी करून ठेवलेला हरभरा देखील चोरून नेला जात असल्याचे सोमवारी सकाळी टेकवाडे शिवारात उघडकीस आले आहे.
बॅटरी चमकताच सावध झाले चोरटे
तालुक्यातील टेकवाडे शिवारात धर्मेंद्र रोहिदास कोळी यांची शेतजमीन असून रब्बी हंगामात तीन एकर हरभरा पिकाची लागवड केली होती. दरम्यान दोन एकरातील हरभरा पिकाची कापणी करुन त्याचे ढिग शेतात ठेवण्यात आले होते.रविवारी रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन शेतातील कापून ठेवण्यात आलेले हरभरे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी हरभर्याचे गाठोडे बांधत असतांना शेतात बॅक्टरीचे उजेड बघून कोणतरी येत असल्याचे बघताच चोरांनी हरबरा बांधलेले गाठोडयांसह चप्पला सोडून घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान चोरट्यांनी 10 ते 12 क्विंटल हरभरा चोरी केला असल्याची माहिती शेतकरी धर्मेंद्र कोळी यांनी दिली.