चोरट्यांचा मोर्चा शेत-शिवारात : शेती साहित्याच्या चोर्‍यांमुळे शेतकरी त्रस्त

Thieves extended PVC Pipe From Adgaon Shet Shiwar यावल : तालुक्यातील आडगाव शेत शिवारातील मनुदेवी रस्त्यालागत असलेल्या शेतातून दोन हजार रुपयाचे पीव्हीसी पाईप अज्ञात चोरट्याने लांबवले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शेतकर्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

शेती साहित्याच्या चोर्‍या वाढल्या
आडगाव, ता.यावल येथील शेतकरी अनिल मधुकर पाटील यांनी यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे मनुदेवी रस्त्यालगत शेत आहे. त्यांच्या शेत गट क्रमांक 203 मध्ये त्यांनी 20 फूट लांबीचे पीव्हीसी पाईपचे पाच नग ठेवले होते. दोन हजार रुपये किंमतीचे सदर पाईप कुणीतरी अज्ञात चोरट्यांने लांबवले. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.