भुसावळ:- शहरातील गजानन महाराज नगरात चोरट्यांनी तीन घरांना लक्ष्य करीत घरफोडी केल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच शहरातील शिवपूर-कन्हाळा रोड ओम पार्कमध्ये चोरट्यांनी एका बंद घराला टार्गेट करीत 20 हजार रुपयांच्या रोकडसह सुमारे चार तोळे सोने लांबवल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरीनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे व सहकार्यांनी पाहणी केली. चोरट्यांनी सिंग नामक व्यक्तीकडे घरफोडी केल्यानंतर काही अंतरावर असलेल्या एका दुकानातही चोरी केल्याचे समजते.