चोरट्यांनी जळगावातील वकीलाची दुचाकी लांबवली

जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला असताना यंत्रणा मात्र तोंडावर बोट ठेवून आहे. शहरातील दुचाकी चोर्‍यांचा तपास थंडबस्त्यात असतानाच नव्यानेच होणार्‍या चोर्‍यांमुळे वाहन धारक धास्तावले आहेत. शहरातील कोर्ट चौकातील रोडवरून चोरट्यानीं वकीलाची दुचाकी लांबवली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांचा वाढला उच्छाद
हेमंत प्रकाश दाभाडे (48, गुरूदत्त कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. जिल्हा न्यायालयात वकील म्हणून व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे गुरूवारख 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ते त्यांच्या दुचाकी (एम.एच.19 ए.जी.576) ने कोर्ट चौकात आले. त्यांनी त्यांची 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी पार्क केली मात्र चोरट्यांनी संधी साधली. दुपारीदोन वाजता दाभाडे हे काम आटोपून आल्यानंतर त्यांना दुचाकी चोरी झाल्याची बाब लक्षात आली. सोमवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.