चोरट्यांनी शेतातील विहिरीच्या पंपाची वायर लांबवली

रावेर : तालुक्यातील कर्जोद येथील शेतात असलेल्या विहिरीवरील इलेक्ट्रीक पंपाची वायर चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेती साहित्याच्या चोर्‍यांनी खळबळ
कर्जोद येथील मनोज अरविंद पाठक यांच्या शेतातील सुमारे 85 फुट मोटर पंपाची केबल अज्ञात चोरट्याने लांबवली. मंगळवारी सकाळी शेतमालक मनोज पाठक शेतात गेले असता त्यांना केबल चोरीची बाब उघडकीस आली. याबाबत रावेर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.