जळगाव : भुसावळातील शे.सादिक शे.नसीर (38, रा. भिस्तीवाडा, जाम मोहल्ला भुसावळ) या संशयीताच्या ताब्यातून एलसीबीच्या पथकाने दोन चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. आरोपीला अधिक तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून जिल्हापेठला दाखल एका गुन्ह्याचा उलगडादेखील झाला आहे.
यांनी केली आरोपीला अटक
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अनिल जाधव, हवालदार अनिल देशमुख, हवालदार कमलाकर बागुल व चालक विजय चौधरी आदींनी आरोपीला अटक केली.